पुणे,
Pune massage center raid शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहव्यापारायावर येरवडा पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई ३१ मार्चच्या रात्री जॉगर्स पार्कजवळील ईश्वरधाम अपार्टमेंटमधील ‘नीरा स्पा’ या मसाज सेंटरमध्ये करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) असे आहे. आरोपी आणि त्याच्या साथीदाराने संगनमताने मसाज सेंटरच्या नावाखाली संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालवला असल्याचे तपासात समोर आले आहे. या ठिकाणी पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात होता.
तपासादरम्यान असेही Pune massage center raid निष्पन्न झाले की, आरोपी पीडित महिलांच्या कमाईवर उपजीविका करत होते आणि त्यांचे लैंगिक शोषणही करत होते. पोलिसांनी छाप्यातून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.या घटनेप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शन देवगडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांकडून पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.