‘सनई चौघडे’ मालिकेचा पहिल्या आठवड्यापासूनच दबदबा

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मुंबई
Sanai Choughade serial झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावते आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत सनई चौघडे मालिकेने स्थान मिळवले . वेगळेपणा आणि भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या लाँच आठवड्यात एक अनोखा उपक्रम राबवला गेला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने 7000 हून अधिक स्वामी भक्तांसोबत ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली.
 

Sanai Choughade serial 
आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज असणार आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सने ओळखला जाणारा, बहुप्रतिभावान आणि संवेदनशील भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’मध्ये दमदार कमबॅक करत आहे. तो मालिकेत ‘सत्यजीत’ ही भूमिका साकारणार आहे.सध्या कथानकात शर्वरी Sanai Choughade serial  नोकरीसाठी मुलाखती देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या योगायोगमुळे कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार आहे