मुंबई
Sanjay Raut ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केलेले विधान राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. राऊत यांनी दावा केला की, पाटील पुढील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. या विधानानंतर चंद्रकांत पाटील यांनीही धक्कादायक प्रत्युत्तर दिले आहे. पाटील यांनी स्पष्ट केले की, भविष्यात संजय राऊत हे ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
पाटील यांनी संजय राऊतांवर सडकून टीका करत म्हटले की, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते राऊतांमुळेच झाले आहेत. “एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत. ते मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगावमध्ये लग्नसोहळ्यात येऊन राजकीय गप्पा मारणे ही त्यांची ठळक सवय आहे. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे सांगण्याची गरज नाही,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांच्या Sanjay Raut म्हणण्यानुसार, राऊत हे ठाकरे गटात मोठी उठाव करणार असून, स्वतंत्र गट स्थापन करून उर्वरित शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचा कोणताही विचार करत नसल्याचेही स्पष्ट केले.संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानात सांगितले होते की, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा-पारोळा मतदारसंघाचे आमदार आगामी निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवतील. दोन्ही नेते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने ही माहिती खात्रीची असल्याचे त्यांनी म्हटले होते.
या परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष लक्ष देण्यात येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या वादामुळे ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामधील संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे.