हनुमान जयंती उत्साहात साजरी

भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Savarkar Chowk, Khamla खामला येथील सावरकर चौकातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आकर्षक रोषणाईने सजविण्यात आलेल्या मंदिरात पहाटे ५.३० वाजता पूजा, आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 
७ ७ ७
 
 
यानंतर पुनम मिश्रा, राजलक्ष्मी अग्रवाल, रश्मी गुप्ता, माधवी चांदुरकर, कुकडे, धांदे व इतरांनी भावपूर्ण “सुंदरकांड” सादर केले. पुढे भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.दुपारपासून दिवसभर “महाप्रसाद”ाचे आयोजन करण्यात आले होते.Savarkar Chowk, Khamla सुमारे २००० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारंग कदम, गणेश कडवे, प्रशांत पाठक, विष्णू खेरा, प्रमोद भोजापुरे, नितीन मांडवकर, उमाकांत रानडे, मोहन चांदुरकर, सतीश अग्रवाल, स्वदेश गुप्ता, आयुर्वेदाचार्य डॉ. भास्कर वाघ आदींसह अनेकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले.या कार्यक्रमाला आंतर भारती आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले,
सौजन्य: उमाकांत रानडे,संपर्क मित्र