पुसदमध्ये डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरची विक्री

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
दोन दुकानांवर पोलिसांची धाड
पाच लाखांवर मुद्देेमाल जप्त

पुसद, 
Selling duplicate electric wire इलेक्ट्रिक दुकानातून विद्युत उपक्रमासाठी लागणारा वायर खरेदी करताय, तर सावधान. विजेची उपकरणे खरेदी करताना तुम्ही जो ‘आयएसआय’ मार्क पाहता, तो साफ खोटा असू शकतो. अलीकडे शहरातील बाजारपेठांमध्ये बनावट आयएसआय चिन्ह असलेल्या उत्पादनांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे भारतीय मानक ब्युरोला या मानक चिन्हाच्या गैरवापराविरोधात कारवाई सुरू करण्यास भाग पडले आहे.
 
 
electric wire
 
शहरात उघडकीस आलेल्या बनावट आयएसआय चिन्हांकित अस्सल ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरच्या मालाचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. शहरातील दोन इलेक्ट्रिक दुकानावर पोलिसांनी धाड टाकली असुन या दुकानातुन अस्सल पॉलीकॅप कंपनीच्या नावाने डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली. या दोन दुकानदारांविरुद्ध शहर पोलिसांनी एका नामांकित कंपनीचा ब्रँड नावाने बनावट विद्युत केबल्स विक्री करीत असल्याच्या आरोपाखाली या विद्युत दुकानांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
 
त्यामुळे विद्युत कामासाठी अस्सल कंपनीचा वायर खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुसद शहरातील रामदेव इलेक्ट्रिकलचा मालक रमेश जलपाराम देवासी आणि महादेव लाईट हाऊस दुकानाचा मालक मंगलराम सुरताजी चौधरी या दोघांवर मंगळवारी पुसद शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शहर पोलिसांच्या सूत्रांची माहिती अशी की, मुंबई येथील अस्सल ब्रँड पॉलीकॅप वायर कंपनीच्या कार्यालयाचे कर्मचारी नागेश्वर कृष्णमूर्ती नंदीगामा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहरातील या दोन्ही दुकानांमध्ये नामांकित असलेल्या पॉलीकॅप ब्रँड कंपनीच्या नावाने हुबेहूब डुप्लिकेट वायरची विक्री केल्या जात होती.
 
 
Selling duplicate electric wire  त्या तक्रारीच्या आधारे शहर पोलिस ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या निर्देशाप्रमाणे डीबी पथकातील सहायक निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोलिस मनोज कदम, दिनेश साळुंखे, मंदाकिनी भगत, आकाश बाभुळकर, शुद्धोधन भगत, इंदू पवार यांनी दोन्हीही दुकानात सापळा रचून धाड टाकली. या धाडीत दुकानाची झाडाझडती घेतली असता अस्सल ब्रँड पॉलीकॅप कंपनीचे डुप्लिकेट आयएसआय चिन्हाचा गैरवापर करून हा इलेक्ट्रिक वायर विक्री केली जात होती. हे विक्रेते ग्राहकांचे केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत, तर निकृष्ट उपकरणांच्या वापरामुळे मोठी जीवित हानीसुद्धा होऊ शकते.
 
 
त्यामुळे वेळीच पोलिसांनी दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु शहरात अशा आणखी दुकानदारांकडे अस्सल ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरची विक्री होत असल्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे.
बनावट इलेक्ट्रिक वायरचा एकूण 5 लाख 9 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल ठेवल्याचे आढळले. नामांकित कंपनीच्या ब्रँड नावाने बनावट विद्युत केबल्स विकल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या दोन दुकानांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्याने डुप्लिकेट माल विकणाèया दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. या दुकानांतून ब्रँडेड कंपनीच्या डुप्लिकेट वायरची खरेदी करणाèया ग्राहकांची फसवणूक झाल्याने भीतीचे वातावरण झाले आहे.