वर्धा :
'Sri Govardhan Yag' श्री शांतिपुरुष सेवा संस्था, नागपूर आणि मा. गो. वैद्य स्मृती न्यास, नागपूर यांच्या संयुत वतीने शनिवार ४ रोजी जिल्ह्यातील मा. गो. वैद्य स्मृती न्यास शेती परिसर येथे श्री गोवर्धन याग आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बाबामहाराज तराणेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Sri Govardhan Yag' सकाळी ८ वाजता यज्ञ विधीला प्रारंभ होणार असून श्री गोवर्धन यागाचे उद्घाटन दुपारी १२ वाजता होईल. महाकौशल प्रांतचे सहग्रामविकास संयोजक ओम ठाकूर यांचे ‘गो आधारित शेती’ आणि शिव समर्थ अॅग्रीटेकचे संचालक सुनी गद्रे यांचे कृषी उत्पादन विपणन विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी १.१५ वाजता बाबामहाराज तराणेकर यांचे अध्यक्षीय उद्बोधन होईल.