मुंबई,
stock-market-closed : गुड फ्रायडेच्या निमित्ताने आज देशातील शेअर बाजार बंद राहणार आहे. साप्ताहिक सुट्टीमुळे येत्या शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्येही बाजार उघडणार नाही, त्यामुळे शेअर बाजार सलग तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे.
भारतीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांवर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) या दोन्ही ठिकाणी व्यवहार होणार नाहीत. याशिवाय इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या सर्व विभागांमध्येही आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
देशातील शेअर बाजारातील पुढील व्यवहार सत्र सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ वाजता सुरू होईल. गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे गुंतवणूकदारांनी आजच्या दिवशी कोणतेही व्यवहार टाळण्याचे आवाहन केले आहे.