जबरी चोरीचा लोहारा पोलिसांनी केला फर्दाफाश

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
आरोपींना घेतले ताब्यात

यवतमाळ, 
Theft exposed लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालकाचे हातपाय, तोंड बांधून चाकूचा धाक दाखवून भरलेला ट्रक चोरी करणाèया तीन आरोपींना लोहारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोहारा एमआयडीसी येथील शासकीय गोदामासमोरून चालक शुभम सतीश मोरे (वय 19, कवठळ, ता. मंगरूळनाथ जि. वाशीम) हा ट्रक क्र. एमएच34 बीझेड2714 सह येथे उभा असताना दोन अनोळखी व्यक्ती त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून त्याचे हातपाय, तोंड, डोळ्यांना पट्टी बांधून त्याला चाकूचा धाक दाखवून ट्रक घेऊन गेल्या. या ट्रकमध्ये असलेले 250 क्विंटल तुरीचे 500 पोते असा एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यातील एकजण ट्रक चालवत नेऊन जबरी चोरी करून घेऊन गेला, अशी तक्रार प्रमोद नवरंगे यांनी तक्रार दिली होती.
 
 
chori
 
Theft exposed  या गुन्ह्यात माहिती मिळताच लोहारा पोलिसांच्या तपास पथकाने कारंजा, वाशीम येथे सापळा रचून कलीमोद्दीन ख्वाजा मिराजउद्दीन (वय 26, नूरनगर, कारंजा जि. वाशीम), मोहम्मद अक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे (वय 35, कोळी ता. कारंजा), सलीमोद्दीन कलीमोद्दीन (वय 39, हातगाव ता. मुर्तिजापूर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील एक आरोपी सलीमोद्दीन कलीमोद्दीन याच्याकडून कारंजा, मुर्तिजापूर व दर्यापूर येथून एकूण 234 क्विंटल तुरीचे पोते किंमत 20,59,200 रुपयांचा माल ताब्यात घेतला. या गुन्ह्यातील आरोपी कलीमोद्दीन ख्वाजा मिराजउद्दीन, मोहम्मद अक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे, सलीमोद्दीन कलीमोद्दीन, इम्रान हसन अब्दुल हसन यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, सहायक अधीक्षक रॉबिन बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक रोहित चौधरी व त्यांचे पथक गजानन अजमिरे, अमोल अन्नेरवार, पवन चिरडे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, नकुल रोडे, कल्पेश रामटेके, रितेश मस्के, विजय कबले यांनी केली.