मुंबई
Jarana Ambani अभिनेत्री आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचा पत्नी टीना अंबानी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मोठ्या बहिण झरना यांचे नुकतेच निधन झाले असून, या दुःखद घटनेने टीना अंबानी खचल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून बहिणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे गौरव केले आहे.
टीना अंबानीच्या मते, झरना त्यांच्या जीवनातील दुसऱ्या आईसमान होत्या. त्यांच्या बहिणीनेच टीना यांचे कन्यादान केले होते टीना यांच्या म्हणण्यानुसार, “ती आमच्या Jarana Ambani आयुषतील एक तेजस्वी चेहरा होती. तिची साथ नेहमीच प्रेमाने भरलेली असायची. आम्हा सर्व बहिणींसाठी, आमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी ती एक प्रेरणा होती. ती सर्वांची लाडकी होती.”टीना अंबानी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत बहिणीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले आहे.