यवतमाळात आदिवासी परधान जमातीचाउपवधू-वर परिचय मेळावा उत्साहात

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
Tribal bride-groom introduction gathering संगीत गुरु हिरासुका लिंगो राज्यस्तर आदिवासी परधान समाज समितीद्वारा आयोजित राज्यस्तर आदिवासी परधान समाज वधुवर परिचय मेळावा यवतमाळ येथील बाळकृष्ण मंगल कार्यालय आर्णी रोड यवतमाळ येथे झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी केपी प्रधान राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय परधान जनजाती उत्थान संघटन नवी दि‘ी हे होते. अतिथी म्हणून प्रा. डॉ. अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य तसेच स्वागताध्यक्ष म्हणून अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके नगराध्यक्ष, नगर परिषद यवतमाळ, प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगड जनजाती आयोगाचे अध्यक्ष रुपसिंग मडावी, राधेश्याम काकोडीया राष्ट्रीय प्रचारक, आदिवासी परधान जनजाती उत्थान संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदिप गेडाम, मुंबई येथील परधान महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदनाताई कुळमते, बिरसा क‘ांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, सेवानिवृत्त सनदी अधिकारी नरेंद्र पोयाम, महेश शिडाम, मनोज गेडाम, शंकर मडावी, कोडापे, सुरेश चिंचोळकर, नरेश गेडाम, पत्रकार बंडू सोयाम, सुरेश किनाके, अशोक मेश्राम, देव कनाके, भोला मडावी, वणीच्या नप अध्यक्ष विद्या सचिन आत्राम व प्रतिष्ठीत मान्यवर, प्रमुख उपस्थित होते.
 
 
parichay
 
कार्यक‘माचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक‘माला आंध‘प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम या नऊ राज्यातील परधान जमातीचे बंधू-भगिनींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, अकोला, अमरावती, बीड, किनवट, नांदेड या जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या सं‘येने उपस्थित होते. या मेळाव्यात प्रधान यांनी परधान समाजाची आदर्श संस्कृती, पूजा पद्धतीची समाज बांधवांना माहिती व्हावी, यासाठी भुमकाद्वारा सभामंडपात पूर्व दिशेला पेन ठाण्याची स्थापना करून पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पूजा मांडली या पुजेकरीता मंदा माणिक मडावी व ज्योत्स्ना अरूण पोयाम या दाम्पत्यांना पुजेचा मान मिळाला. सर्व समाजबांधवांनी आदरपूर्वक पेन ठाण्याचे दर्शन घेतले.
 
 
Tribal bride-groom introduction gathering  कार्यक‘माच्या स्वागताध्यक्ष प्रियदर्शनी यांच्याहस्ते महाराष्ट्र राज्यातील झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये परधान जमातीच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित नप अध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी, समाजासाठी भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले. या समाजाप्रती दायित्व मी पूर्ण करील. समाजाच्या उन्नतीसाठी सदोदित प्रयत्न करीन असे अभिवचन दिले. कार्यक‘माचे अध्यक्ष केपीप्रधान यांनी परधान उदय कुठे झाला, मूळ संस्कृती कोणती आहे, भारत देशात ११ राज्यांमध्ये परधान जमात असून आद्य गुरु संगीतगुरु हिरासुका लिंगो हे आहेत. त्यांची शहीद भूमी कचारगड आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये परधान जमाती विषयी विस्तृत माहिती दिली. येणार्‍या काळात परधान जमातीच्या उत्थानाकरिता संपूर्ण देशांमध्ये एक कृती कार्यक‘म राबवल्या जाईल व त्याला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके साथ देतील अशी आशा व्यक्त केली.
 
 
कार्यक‘माच्या स्वागताध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी आपले आद्य गुरु संगीत गुरु हिरा सुका लिंगो यांची माहिती घराघरापर्यंत पोहोचावी या उद्देशाने त्यांची प्रतिमा सर्व समाज बांधवांना भेट दिली. प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. तुषार व प्रतीभा राजू किनाके यांनी तर आभार प्रा. प्रफुल आडे यांनी मानले. या कार्यक‘माला संयोजक बंडू मेश्राम, नंदू अरके, राजेश गेडाम, अशोक गेडाम, अरुण पोयाम, पुरुषोत्तम घोडाम, राजू किनाके, किशोर सलामे, सुभाष गेडाम, डॉ.ताराचंद गेडाम, विजय मडकाम, पवन मंगाम, आकाश चांदेकर, नीलेश चांदेकर, अविनाश पेंदाम, बादल सराटे, आशिष मसराम, सराटे, अजय मडकाम, आकाश गेडाम, विनोद मेश्राम, आर्यन उईके, राजेश नागभिडकर, गजानन किनाके, हरीश तोडसाम, समाजातील इतर सर्व संगीत गुरू हिरासुका लिंगो, राज्यस्तर आदिवासी परधान समाज समिती यवतमाळच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.