हदगाव,
Tuberculosis Eradication Day राज्य शासनाच्या आदेशानुसार तसेच नांदेड जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनात जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या उपस्थितीत बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक‘माच्या प्रारंभी क्षयरोगाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट कोच यांना विनम‘ अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. यानंतर डॉ. संजय मुरमुरे यांनी उपस्थित कर्मचारीवर्गाला क्षयरोग निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, जनजागृतीचे महत्त्व तसेच रुग्णांच्या वेळेवर निदान व उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, यासाठी रुग्णांनी नियमित औषधोपचार घेणे व पोषणाकडे लक्ष अत्यंत गरजेचे असल्याचेही अधोरेखित केले.
Tuberculosis Eradication Day कार्यक‘मास वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे, डॉ. बरगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभय आरेवार, डॉ. विजय कानोडे, डॉ. अनिता धनवे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक पुष्पलता ढवळे, वसावे, तालुका नर्सिंग अधिकारी बनसोडे, औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख, प्रयोगशाळा अधिकारी आश्लेषा गाडे, आरोग्य सहायक राठोड, आरोग्यसेवक पतींग आरोग्यसेविका टेकाळे, गाडेकर, जाधव, आडे, परिचर बापुराव थाटे, इस्माईल शेख, वाहनचालक गजानन राठोड यांच्यासह बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपरखेड, अंबाळा, गोर्लेगाव, कवाना व बरडशेवाळा उपकेंद्रांतील सर्व आरोग्य कर्मचारी व मदतनीस मोठ्या सं‘येने उपस्थित होते.