उंबर्डा बाजार येथे विजांच्या कडकडाट सह अवकाळी पाऊस

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
उंबर्डा बाजार, 
Umbarda Bazaar: Unseasonal rain हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शयता वर्तवण्यात आलेली असतानाच, उंबर्डा बाजार सह परीसरात पावसाने हजेरी लावली असून, या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. उंबर्डा बाजार येथे काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.
 
 
Umbarda Bazaar
 
Umbarda Bazaar: Unseasonal rain  त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार यांच्यात पुन्हा चिंतेत भर पडली आहे. गावरान आंबा संत्रा, कांदा, काकडी त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं व उन्हाळी पिकांचे मोठं नुकसान होण्याची शयता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गहु, हरभरा ही रब्बी पिके ९० टक्के शेतकर्‍यांच्या घरात आली आहेत. मात्र, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.