अवकाळी पावसाने रस्त्याची दैनावस्था

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
रस्त्याने चालणे झाले कठीण
शिरपूर जैन, 
Unseasonal rain अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शिरपूर च्या रस्त्याची दैनावस्था झाली असून, वाहनधारकासह पादचार्‍यांना रस्त्याने चालणे अवघड झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून शिरपूर येथे अवकळी पावसाने हजरी लावली. या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पावसामुळे बसस्थानक व ग्रामपंचायत समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले.
 
 
Unseasonal rain
 
Unseasonal rain  सोबतच बसस्थानक ते रिसोड फाट्या पर्यंत रस्त्याची दुर्लक्षित अवस्था वाहन धारकांना अडचणीची ठरली. ठिक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाण्यामुळे वाहन धारकांची पंचाईत झाली. रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार करुनही याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची शयता नाकारता येत नाही. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.