राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम

अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
मुंबई
Unseasonal rain राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला असून, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

Unseasonal rain Maharashtra 2026, India weather alert, IMD orange alert districts, 
गुरुवारी पुणे शहरात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. दुपारच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात अचानक अंधार पसरला होता. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुण्यासह राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पावसासोबत गारपिटीची नोंद झाली आहे.सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी आजही गारपिटीची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिकाला फटका
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे तीन दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतमाल साठवून ठेवण्यात आला होता. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे हा माल भिजून खराब झाला.
चोपडा (जि. जळगाव) येथे वादळी Unseasonal rain वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे झालेल्या पावसामुळे ज्वारीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मोठी हतबलता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.दरम्यान, निफाड तालुक्यातील कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, रुई आणि मानोरी फाटा परिसरातही दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात होऊनही पावसाचा जोर कायम असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.