लाभार्थ्यांना 27.48 लाखांची मदत वितरण
वणी,
Vani Nagar Parishad: Disabled वणी नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नगर परिषद अध्यक्ष विद्या खेमराज आत्राम यांच्या हस्ते एकूण 307 दिव्यांग लाभार्थ्यांना तब्बल 27 लाख 48 हजार 600 रुपये आर्थिक मदत वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, नगरसेवक, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vani Nagar Parishad: Disabled या प्रसंगी बोलताना नप अध्यक्ष विद्या आत्राम यांनी सांगितले की, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची नितांत गरज आहे. वणी नप दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले. या आर्थिक मदतीमुळे दिव्यांग नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.