व्हिडिओ गेम पार्लरवर छापा

    दिनांक :03-Apr-2026
Total Views |
वर्धा :
video game parlor स्थानिक शास्त्री चौकातील मेघल कॉम्प्लेसमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेमर्पालवर छापा टाकून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत एकाला अटक केली. ही कारवाई शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली.
 
 

video game 
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
video game parlor  शहर पोलिसांची चमू गस्तीवर असताना त्यांना शास्त्री चौकातील मेघल कॉम्प्लेस समोर काही व्यती उभे दिसले. पोलिसांचे वाहन पाहताच काही जण पळून गेले. यावेळी पोलिसांनी रोहित अरक (३२) रा. हिंगणघाट फैल, पुलगाव याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने हा गाळा प्रवीण वाघमारे रा. हिंगणघाट याने भाड्याने घेतला असून तोच व्हिडिओ गेम पार्लर चालवित असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी १० व्हिडिओ गेम मशिन, खुर्च्या, स्टुल, रोख, एक मोबाईल, असा ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.