नागपूर विभागात दुसरा क्रमांक
वर्धा,
शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने नपच्या कर विभागाद्वारे १०० टके वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी ८२ लाख रुपये Wardha Municipal Council Tax Collection टॅस वसूल करण्यात आला. थकित व चालू असे एकूण ९ कोटी ५० लाख रुपये टॅस वसुली झाली आहे. टॅस वसुलीत वर्धा नगरपरिषद नागपूर विभागातून द्वितीय क्रमांकावर असून आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
Wardha Municipal Council Tax Collection आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वर्धा नगरपरिषदेला चालू व थकीत असे एकूण ११ कोटी ८१ लाख कर वसुलीचे लक्ष्य होते. त्यामध्ये चालू ६ कोटी ८७ लाख व थकीत ४ कोटी ९३ लाख रुपयांचा समावेश आहे. शहरातील नागरी सुविधा अधिक भकम करण्याच्या दृष्टीने कर वसुली अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. थकित व चालू वर्षातील कर भरण्याकरिता जनतेला प्रवृत्त करण्याकरिता नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी थकीत करावर लागणार्या व्याजातून (शास्ती) शहरवासीयांना दिलासा देण्याकरिता लागू केलेली अभय योजनेचा मोठा फायदा झाल्याचे दिसते. शहरात जवळपास २८ हजार संपत्तीधारक असून कर भरण्याकरिता त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत ९ कोटी ५० लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. यामध्ये थकीत वर्षातील ८५ टके तसेच चालू वर्षातील ७८ टके कर वसुली पूर्ण झाली आहे. ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८२ लाख रुपये कर वसुली झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली एका दिवसात कधीच झाली नाही, असे अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. कर वसुलीमध्ये नागपूर विभागातून वर्धा द्वितीय स्थानावर असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी कर विभागाच्या प्रमुख प्रयोजा नेमिनीवर तसेच कर्मचार्यांचा सत्कार केला.
अभय योजनेचा ८५ टके जनतेने घेतला लाभ
थकीत करावर व्याज वाढतच होते. अभय योजना लागू झाल्यामुळे ८५ टके करधारकांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून २ कोटी रुपये कर माफ करण्यात आल्याचे कर विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
नगर परिषदेची उपलब्धी गौरवास्पद : पांगुळ
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील जनता, नगरसेवक, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन नाविन्यपूर्ण कार्य करण्याचा आपला मानस आहे. आता पहिल्या टप्प्यात शास्ती म्हणजेच थकीत करावर लागणार्या व्याजातून शहरवासीयांना दिलासा देण्यात आला आहे. कर वसुलीत नागपूर विभागातून मिळालेले वर्धेला द्वितीय स्थान हे निश्चितच गौरवास्पद आहे, अशी प्रतिक्रीया नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिली.