सुसाट्याचा वारा अन् पावसासह गारा
वाशीम,
Washim: Unseasonal rain वाशीम जिल्ह्यात शुक्रवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतानंतर अवकाळी पावसाने वादळी वार्यासह गारांचा पाऊस पडल्याने पिकांना फटका बसला आहे. गारा व वादळी वार्यासह झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामे करुन शासनाकडून मदत देण्याची शेतकर्यांनी केली आहे. वादळ वार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. आकाशात जमलेल्या काळेकुट्ट ढगामुळे अंधारसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर १ व २ एप्रिल रोजी मालेगाव, कारंजा, मानोरा या तालुयात काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडला. ३ एप्रिल रोजी वाशीम शहरासह तालुयात सायंकाळी ५ वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळवले. यंदा आंबा पिकाला चांगली फलधारणा झाली होती. मात्र, अवकाळी पावसासह वादळी वार्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय संत्रा, टरबूज आणि लिंबू या फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, जिल्ह्यात बिजवाई कांद्याची लागवड यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. हे पीक काढणीच्या टप्प्यावर असतानाच अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने हे पीक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
Washim: Unseasonal rain कारंजा तालुयात ३० मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा उशिरा पेरणी केलेल्या गहू, हरभरा, भाजीपाला, हळद तसेच इतर हंगामी पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी वादळी वार्यामुळे पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात गुरुवारी सांयकाळपर्यंत कोठेही पाऊस पडला नसला तरी शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात गारासह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बिजवाई कांदा पिक आडवे झाले, तर आंब्याची फळेही मोठ्या प्रमाणात गळून पडली. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
वाशीम शहरात गारासह अवकाळी पाऊस
वाशीम शहर व तालुयात काही भागात सायंकाळी ५ वाजता नंतर अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा होवून विजेच्या कडकडाट, वादळासह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर हरभरा आकाराच्या गारा देखील पडल्या. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अर्धा तासाच्या वर गारासह पाऊस पडला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तसेच फुटपाथवर दुकाने लावून उदरनिर्वाह करणार्या व्यवसायिकांमध्ये एकच धांदल उडाली. विजेचा प्रचंड कडकडाट, सुसाट्याचा वारा आणि पावसासह गारा यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते.