नवी दिल्ली
Ministry of Road Transport and Highways रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदलाचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये ई८५ (८५ टक्के इथेनॉल आणि पेट्रोल) आणि ई १०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) यांसारख्या इंधनांचा औपचारिक समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आयात केल्या जाणाèया तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल.
Ministry of Road Transport and Highways सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (ई२० ) आधीच लागू केले आहे. नवा प्रस्ताव याच्याही पुढे जाणारा आहे. जास्त इथेनॉल वापराच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. मसुद्यात बायोडिझेलला बी१० वरून बी१०० पर्यंत मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच हायड्रोजन-सीएनजी मिश्रणाचाही यात समावेश करण्यात आला आहे. सोमवार, २७ एप्रिलच्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या बदलांवर ३० दिवसांत संबंधित घटकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे फ्लेक्स-फ्युएल आणि शुद्ध बायोफ्युएल वाहनांचा मार्ग मोकळा होईल.