धाममध्ये ४६.७३ टके उपयुक्त जलसाठा

वर्धेसह १५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
water storage एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील तापमानाने मागील ३० वर्षांचा विक्रम मोडला. यंदा एप्रिल महिन्यातच सर्वाधिक म्हणजे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. महाकाळी येथील धाम प्रकल्प वर्धा शहरासह परिसरातील १५ गावांची तृष्णा भागवते. वाढत्या तापमानामुळे या जलाशयातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने वर्धा शहर आणि परिसरातील १४ गावांत आगामी काळात पाणी समस्या डोकेवर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २९ एप्रिल रोजी धाम प्रकल्पात ४६.७३ टके उपयुक्त जलसाठा असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
water storage
 
 
हवामान विभागाने मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहे. उष्णतेची हीच परिस्थिती कायम राहिल्यास मे अखेरीस धाम प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. सन २०१९ च्या उन्हाळ्यात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा लागला होता. सध्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास आणि वर्धा पाटबंधारे विभागाने उंटावरून शेळ्या हाकलण्याचे धोरण कायम ठेवल्यास आगामी काळात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
 
धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका शहरातील तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिपरी मेघेसह १४ गावांना पाणी पुरवठा करते.water storage वर्धा शहरात १४ हजार ६८१ नळ जोडण्या दिल्या आहेत. वर्धा शहराशेजारील १४ गावांत मजिप्राने सुमारे २० हजार नळ जोडण्या दिल्या आहे. उपलब्ध पाण्याचे प्रभावी नियोजन न केल्यास नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.