पाेलिस दलातील 55 पाेलिसांना महासंचालकांचे पदक

दाेन पाेलिस उपायुक्तांचाही समावे

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
director generals medal महाराष्ट्र पाेलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल, धाडसी कामगिरी आणि कर्तव्यदक्षतेसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण पाेलिस दलातील पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाेलिस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली आहेत. आयुक्तालयातील 54 पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डीजी इन्सिग्नीया पदक जाहीर झाले आहे.
 

55-police-officers- 
 
राज्य पाेलिस दलात सलग 15 वर्षे उत्तम अभिलेख, प्रसंशनीय कार्य, क्लिष्ट आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल, नैसर्गिक आपत्तीत याेगदान, उत्कृष्ट तपास, दाेषसिद्धीत याेगदान अशा कामगिरीच्या आधारावर या पदकाची घाेषणा करण्यात येते. नागपूर पाेलिस दलातील पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी आणि उपायुक्त निकेतन कदम या दाेन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाेलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.director generals medal तसेच एसीपी विलास शेंडे, एसीपी रमेश बरकते यांच्यासह पाेलिस निरीक्षकांमध्ये बेलतराेडी पाेलिस ठाण्याचे ठाणेदार मुकुंद कवाडे, गुन्हे शाखेच्या पाेलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, पाेलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे, विनायक काेळी, रमेश ताले, कलमनाचे ठाणेदार प्रवीण काळे, नंदनवनचे ठाणेदार कैलास देशमाने, पाेलिस निरीक्षक याेगेश घारे, सुरेश आस्कर, सहाय्यक पाेलिस निरीक्षक मनाेज कवडे, निलेश पिंपळशेंडे, राजू सिरबाेइना, निलेश घाेगरे, अमाेल गाेखले आदींचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या सर्व पाेलिस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही याच समर्पणाने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
 

55-police-officers- 
 
 
या पाेलिस कर्मचाऱ्यांना मिळाले पदक
सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक भावना नाडार, जितेंद्र सडमाके, विनाेदसिंह ठाकूर, रहमतुल्ला शेख, संताेषसिंह ठाकूर, संजय साेनुलकर, सीमा टेकाम, राजेश पांडे, किशाेर मालाेकर, कृष्णकुमार पांडे, सुनील कुंवर, महेंद्र केसरे, अश्विन मांगे, राधेश्याम कांबळे, स्वप्निल बडे, सचिन टापरे, महेश नायक, नितीन रांगणे, सचिन मांडले, सुहास शिंगणे, संजय शाहू, आनंद मरसकाेल्हे यांच्यासह इतर पाेलिस कर्मचाèयांचाही पदक जाहीर झाले
.