जिल्हा पोलिस दलातील ६ अधिकारी-कर्मचार्‍यांना मानाचे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सत्कार

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
वर्धा,
polices honorary medal महाराष्ट्र पोलिस दलात उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या पोलिस अधिकारी व अंमलदारांना महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून दरवर्षी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. २०२५ या वर्षासाठी जाहीर झालेल्या अत्यंत मानाच्या पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदकांमध्ये वर्धा जिल्हा पोलिस दलातील २ पोलिस अधिकारी आणि ४ अंमलदारांनी आपले नाव कोरले आहे.
 
 
polices honorary medal
 
 
पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकारी व ४ अंमलदारांनी हा गौरव प्राप्त केला आहे. यात तळेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, वर्धा वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अमोल लगड, जाम महामार्ग पोलिस भारत पिसुडे, सायबर ठाण्याचे पोलिस हवालदार दिनेश बोथकर, देवळी ठाण्याचे सहाय्यक फौजदार सतीश दरवरे, पोलिस मुख्यालयातील पोलिस शिपाई सुनैना डोंगरे यांचा समावेश आहे.
 
या सर्व सन्मानार्थीनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन आणि लिष्ट तांत्रिक तपास क्षेत्र तसेच खेळाच्या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे.polices honorary medal त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले असून शुक्रवार १ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या राजपत्रानुसार, राष्ट्रपती पदकप्राप्त तसेच विविध प्रवर्गात उत्तम कामगिरी करणार्‍या या अधिकारी, कर्मचार्‍यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. या गौरवामुळे वर्धा जिल्हा पोलिस दलाची मान उंचावली असून इतर कर्मचार्‍यांनाही यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.