अमेरिकेने भारताला सोपवला प्राचीन वारसा!

परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
India-America भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी सुरू आहे. यामागे अनेक रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारताच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित मोठा निर्णय घेत तब्बल ६५७ प्राचीन वस्तू भारताला परत केल्या आहेत. या प्रकरणात प्राचीन वस्तू तस्कर सुभाष कपूर आणि नॅन्सी वीनर यांच्या नेटवर्कचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
 india america
India-America  न्यूयॉर्कमध्ये आयोजित समारंभात भारताच्या वाणिज्यदूत राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत या वस्तू अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आल्या. मॅनहॅटन जिल्हा अटर्नी यांनी या कारवाईबाबत सांगितले की, भारताच्या सांस्कृतिक वारशावर डोळा ठेवणाèया तस्करी जाळ्याचा प्रभाव मोठा आहे आणि आज परत मिळालेल्या शेकडो वस्तू त्याचेच उदाहरण आहेत.

किंमत १२० कोटी रुपये
India-America  दरम्यान, अमेरिकेने सुमारे १२० कोटी रुपये किमतीच्या सुमारे 657 दुर्मीळ आणि प्राचीन मूर्ती आणि कलाकृती भारताला परत केल्या आहेत. या 657 वस्तू तीन टप्प्यांत भारतात परत करण्यात आल्या. नोव्हेंबर २०२४ मध्ये ६१२ वस्तू, जुलै २०२५ मध्ये २६ वस्तू आणि २८ एप्रिल २०२६ रोजी शेवटच्या टप्प्यात १९ वस्तू भारतात परत आल्या. यापैकी १७ वस्तू थेट सुभाष कपूरशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजूनही एक हजार वस्तूंची प्रतीक्षा!
India-America  विशेष म्हणजे, अजूनही सुमारे १००० हून अधिक प्राचीन वस्तू परत येणे बाकी असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील तपास यंत्रणांनी पुढील काळातही सहकार्य कायम ठेवून या वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
India-America  या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ‘इंडिया प्राईड’चे सहसंस्थापक एस. विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ आहे. त्यांनी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्सचे विशेष आभार मानत, भारतातील चोरी गेलेल्या देवतांच्या मूर्ती आणि कलावस्तू परत मिळवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. एकूणच, भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या पुनर्स्थापनेसाठी ही मोठी आणि सकारात्मक घडामोड मानली जात आहे. या कारवाईमुळे जागतिक स्तरावर कलावस्तू तस्करीविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळाले आहे.