नागपूर,
Ayan Lahori अवघ्या ११ व्या वर्षी आयान लाहोरी याने ‘Hans Creations’ या नावाने रेजिन आर्ट व्यवसाय सुरू करत स्वतःच्या मेहनतीतून PS5 घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.प्ले स्टेशन घेण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्याने स्वतः कमाई करण्याचा निर्धार केला.
सुरुवातीला बुकमार्क व सजावटीच्या वस्तू तयार करत त्याने नंतर कस्टमाइज्ड कीचेन बनवण्यावर भर दिला. त्याला १५८ पर्सनलाइज्ड कीचेनचा पहिला मोठा ऑर्डर रश्मी सौरभ भिडे यांच्याकडून मिळाला Ayan Lahori असून सध्या अनेक ऑर्डर्स प्रलंबित आहेत.आयान हा सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी असून सॅफायर क्रिकेट क्लबचा सदस्य आहे.
सौजन्य:पियू लाहोरी,संपर्क मित्र