नागपूर,
Cleanliness campaign महानगरपालिकेच्या प्रशासन काळानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी कामांना वेग दिला असून प्रभाग १५ चे नगरसेवक विनय दाणी यांनी रामदासपेठ-शंकरनगर परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले आहे.
या अंतर्गत रस्ते सफाई, गटर लाईन दुरुस्ती, फुटपाथ स्वच्छता, कचरा उचलणे यांसारखी कामे जोमाने सुरू आहेत. संपूर्ण परिसरात डीप क्लिनिंग करण्यात येत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.याशिवाय बगीच्यांची सुधारणा व फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे.Cleanliness campaign परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
सौजन्य:आशिष नाईक,संपर्क मित्र