पीकविमा भरपाई करून विमा कंपनीवर कारवाई करा

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
वणी,
crop insurance वणी तालुक्यातील पीकविमा धारक शेतकèयांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकèयांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात तालुकास्तर विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
 

crop insurance 
शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत हंगाम 2025-26 मध्ये खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी पिकांसाठी महसूल व कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकèयांनी स्वखर्चाने विमाहप्ता भरला होता. तालुक्यातील हजारो शेतकèयांनी मोठ्या प्रमाणात विमा काढला होता.
दरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाने नैसर्गिक आपत्तीतील नुकसानासाठी अनुदान जाहीर केले असले तरी विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अपेक्षित होते. शासन धोरणानुसार जानेवारी 2026 पर्यंत भरपाई मिळणे अपेक्षित असताना, तीन महिने उलटूनही संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही.यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून विमा कंपनीकडून होत असलेला हा विलंब अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका समितीची बैठक तातडीने बोलावून संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग व शेतकरी यांची समोरासमोर चर्चा करून शेतकèयांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच कृषी अधिकाèयांनाही देण्यात आली असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.