कॅनडात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
व्हँकुव्हर.
Diljit Dosanjh's concert in Canada कॅनडातील व्हँकुव्हर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या संगीत कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाल्याने मोठी खळबळ माजली आहे. रंगतदार वातावरणात सुरू असलेल्या या कार्यक्रमात काही कट्टर विचारसरणीचे लोक घुसल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला.कार्यक्रमादरम्यान काही जणांनी वेगळ्या राष्ट्राच्या मागणीशी संबंधित झेंडे फडकवत घोषणाबाजी केली. त्यांनी भारतविरोधी घोषणा देत गायकालाही लक्ष्य केले आणि त्यांच्यावर राजकीय कल असल्याचे आरोप केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
 
canada diljit concert
 
सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी प्रतिकार करत गोंधळ वाढवला. काही काळासाठी कार्यक्रम थांबवावा लागला, मात्र नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळत कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आला.या प्रकरणामागे दोन तरुणांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत असून, त्यांचा संबंध सिख्स फॉर जस्टिस या संघटनेशी असल्याची चर्चा आहे. ही संघटना भारतात बंदी घालण्यात आलेली असून, तिचे नेतृत्व गुरपतवंत सिंग पन्नू करत असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर आयोजकांनी आगामी कार्यक्रमांसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात होणाऱ्या भारतीय कलाकारांच्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कलाकार आणि प्रेक्षक दोघांमध्येही चिंता वाढली आहे.