चंद्रपूरच्या चार पोलिसांना महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
director general awards महाराष्ट्र पोलिस दलात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जाणारा सन 2026 चा ‘पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह’ (पदक) चंद्रपूर पोलिस दलातील तीन अधिकारी व अंमलदार अशा चौघांना जाहीर झाला आहे.
 

director general awards 
 
1 मे 2026 रोजी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानचिन्हाने गौरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये गडचांदूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी भिमराव कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माधव गौरकार, चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विलास झिटुजी निकोडे व चंद्रपूर पोलिस मुख्यालयाचे हवालदार संदीप कृष्णाजी उपरे यांचा समावेश आहे.director general awards हे पुरस्कार संबंधित अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवलेले अतुलनीय साहस, कर्तव्यपरायणता आणि गुन्हे तपासातील नैपुण्य याची दखल घेऊन जाहीर करण्यात आले आहे.