लेह,
Earthquake in Leh लडाखमधील लेह परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे साधारणपणे ३ वाजून ५४ मिनिटांनी हा धक्का बसला आणि अचानक जमिनीचा कंप जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर मापन पद्धतीनुसार ४.१ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंप निरीक्षण केंद्राच्या माहितीनुसार, या धक्क्याचे मूळ स्थान जमिनीखाली सुमारे दीडशे किलोमीटर खोल होते. सुदैवाने, या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. दरम्यान, देशातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांत अशा सौम्य धक्क्यांची नोंद होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी राजस्थानमधील खैरताल तिजारा परिसरातही कमी तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या धक्क्याचे मूळ स्थान जमिनीच्या अगदी कमी खोलीवर असल्याचे सांगितले जाते.