अकोला,
jaya pandurang ingole अकोला-पंचायत समिती अकोला येथे बांधकाम विभागात कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता जया पांडुरंग इंगोले (४९) रा.महात्मा फुले नगर मोठी उमरी यांना गुरुवार,३० रोजी तीस हजारांची लाच स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

तक्रारदार यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंक विभागाकडे तक्रारा केली की, त्यांनी २०२४ मध्ये ११० मीटर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधला.याप्रकरणी देयक काढण्याचा मोबदला म्हणून संबंधित कनिष्ठ अभियंता जया इंगोले यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारीवरून एसीबीने २८ एप्रिल रोजी महात्मा फुले नगर मोठी उमरी येथील त्यांच्या राहत्या घरी पडताळणी केली असता लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार एसीबीने गुरुवार, ३० एप्रिल रोजी पंचायत समितीत सापळा रचला व दोन्ही पंचा समक्ष तक्रारदाराकडून संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.jaya pandurang ingole याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई बापु बांगर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, सचिंन्द्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली मिलींदकुमार बहाकर पोलीस उपअधीक्षक, अर्चना घोडेस्वार, भाग्यश्री काशीद पोलिस हवालदार दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, पोलिस अंमलदार असलम शहा, नितीन पाटील, चालक नफीस शेख यांनी पार पाडली.