महाराष्ट्र दिनाचे औचित्य: गोंदियातील ९ पोलिस अधिकारी व अंमलदारांना ‘महासंचालक पदक’ जाहीर

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
गोंदिया,
gondia director generals महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा मानाचा 'पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र' पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील ९ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झाला आहे. उद्या, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या सर्वांचा गौरव करण्यात येणार आहे.
 
 
 
gondia director generals
 
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, पोलिस दलात विविध विभागांत बजावलेली उल्लेखनीय कामगिरी, तसेच राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक व शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाते. सन २०२५ या वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यातील नऊ शिलेदारांची या पदकासाठी निवड झाली आहे. ज्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) पुरुषोत्तम आहेरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय नाईक, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, पोलिस हवालदार प्रकाश गायधने, पोलिस हवालदार अनिल कोरे, पोलिस हवालदार लियानार्ड मार्टिन, पोलिस शिपाई अतुल कोल्हटकर, पोलिस शिपाई भास्कर हरीणखेडे यांचा समावेश आहे.gondia director generals कर्तव्यदक्षता आणि सेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे या नऊही जणांनी जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. १ मे रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या निवडीमुळे गोंदिया जिल्हा पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.