मुंबई:
police officers in maharashtra महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सन २०२५ या वर्षासाठीचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. एकूण ३२२ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना या मानाच्या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या विविध निर्णयानुसार, ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या सेवेमध्ये विशेष शौर्य दाखवले आहे किंवा ज्यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्राप्त झाले आहे, अशांची निवड या सन्मानचिन्हासाठी केली जाते.
यादीतील प्रमुख नावे:
या पुरस्कारार्थींमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस अंमलदारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने:
ज्योती प्रिया सिंह (पोलीस उपमहानिरीक्षक)
नियती ठाकर-दवे (अपर पोलीस आयुक्त)
विनिता साहू (अपर पोलीस आयुक्त)
बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त)
डॉ. दिपाली राजेंद्र धाटे (पोलीस उपआयुक्त)
याशिवाय गडचिरोली, गोंदिया यांसारख्या नक्षलग्रस्त भागांत प्राणांची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांना आणि मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार अशा विविध पोलीस आयुक्तालयातील कर्तबगार अंमलदारांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.
सन्मानाचे स्वरूप:
निवड झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.police officers in maharashtra या पुरस्कारामुळे पोलीस दलाचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा हा मोठा गौरव मानला जात आहे. पोलीस महासंचालकांनी सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.