बहावलपूर
Jaish-e-Mohammed पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा निकटवर्तीय असलेला सर्वोच्च कमांडर मौलाना सलमान अझरला अज्ञात वाहनाने चिरडले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे त्याचा जागीच मृत्यू झाला.
Jaish-e-Mohammed सलमान अझर हा भारताविरुद्धच्या अनेक मोठ्या दहशतवादी कटांचा सूत्रधार होता आणि त्याला मसूद अझरच्या सर्वांत विश्वासू सहकाऱ्यापैकी एक मानले जात होते. या घटनेमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय पासून ते त्यांच्या दहशतवादी सूत्रधारांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलमानच्या मृत्यूचा संबंध ‘टार्गेट किलिंग’शी जोडला जात आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान अझर रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. घटनेनंतर चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. पाकिस्तानी तपास यंत्रणा या घटनेला एक सामान्य अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या सातत्याने होणाèया हत्येमुळे दहशतवादी संघटनेत दहशत असताना हत्या घडविणाèयाचा शोध घेण्यात पाकिस्तानातील पोलिस व तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहे.
मौलाना सलमान अझर कोण होता?
Jaish-e-Mohammed सलमान अझर जैश-ए-मोहम्मदमधील अत्यंत प्रभावशाली आणि जागतिक दहशतवादी मसूदचा सर्वांत विश्वासू सहकाèयांपैकी एक होता. संघटनेचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्याच्या सल्ल्यानुसार घेतले जात असत. भारताविरुद्ध दहशतवादी कट रचणे, नवीन दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि निधी उभारणे यात त्याची मुख्य भूमिका होती. त्याच्या मृत्युमुळे जैश-ए-मोहम्मदच्या अंतर्गत रचनेला गंभीर धक्का बसला आहे.