नागपूरच्या पाेलिस अधिकाऱ्याने सर केले धाैलागिरी शिखर

जगातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर: महाराष्ट्रातील पहिलेच अधिकारी

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
mountaineer shivaji nanware नागपूर शहर पाेलिस दलात कार्यरत शिवाजी ननवरे यांनी गिर्याराेहण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे नेपाळमधील धाैलागिरी शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. संबंधित शिखराची उंची 8, 167 मीटर इतकी आहे. अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पाेलिस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहे.
 
 
mountaineer shivaji nanware
 
शिवाजी ननवरे यांनी यापूर्वीही जगातील अनेक उंच आणि आव्हानात्मक शिखरे सर करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. यामध्ये माउंट एव्हरेस्ट (8,848.86 मीटर), माउंट लाेहत्से (8,516 मीटर), माउंट मकालू (8,485 मीटर) आणि माउंट मनास्लू (8,163 मीटर) या शिखरांचा समावेश आहे. या सलग माेहिमांमुळे त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य गिर्याराेहकांमध्ये घेतले जाते. धाैलागिरी हे शिखर गिर्याराेहकांसाठी अत्यंत कठीण मानले जाते.mountaineer shivaji nanware तीव्र थंडी, कमी ऑक्सिजन, अनिश्चित हवामान, र्बाचे वादळ यामुळे प्रत्येक पाऊल जीवघेणे ठरू शकते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ननवरे यांनी अपार धैर्य, जिद्द आणि अचूक नियाेजनाच्या जाेरावर हे शिखर सर केले.
 
पाेलिस सेवेत कार्यरत राहून एवढ्या उंचीवरील आणि धाेकादायक शिखरावर विजय मिळवणे ही अतिशय दुर्मीळ आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जाते. त्यांच्या या यशामुळे पाेलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी नागपूर पाेलिस आयुक्त डाॅ. सिंगल, सह पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पाेलिस उपायुक्त राहुल माकणीकर, तसेच सहाय्यक पाेलिस आयुक्त अभिजीत पाटील आणि पाेलिस निरीक्षक राहुल शिरे यांचे मार्गदर्शन लाभले.