चंद्रपूर,
nature experience in tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनातर्फे शुक्रवार, 1 मे रोजी बुद्ध पोर्णिमानिमित्त निसर्ग अनुभव-2026 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पाणवठ्यावरील मचानवरून रात्रभर वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
एकूण 57 मचान उपलब्ध असून, प्रत्येक मचानवर कमाल 2 जण उपस्थित असतील. मागील वर्षी प्रति मचान एकूण शुल्क 4 हजार 500 प्रत्यक्ष भरावे लागत होते. यावर्षी शुल्कात कपात करून अधिक जणांचा सहभाग व्हावा याद्दष्टीने प्रोत्साहन सहभाग शुल्क प्रति मचान 3 हजार 500 (कमाल 2 व्यक्तीसाठी) निश्चित करण्यात आले होते.
ज्यांना संधी मिळाली आहे, ते 1 मे रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या सफारी गेटवर हजर राहणार आहेत. कार्यक्रमाची समाप्ती 2 मे रोजी सकाळी 6 वाजता होईल. वाहतूक व्यवस्था केवळ ताडोबा अधिकृत वाहनांद्वारे करण्यात येईल. खाजगी वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.nature experience in tadoba हा उपक्रम वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती व जबाबदार पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असून, नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांचे निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले.