निकेतन कदम अमरावतीचे नवे पोलिस अधीक्षक

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अमरावती,
niketan kadam अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची राज्याच्या गृहविभागाने गुरूवारी संध्याकाळी बदली केली. त्यांच्या जागेवर नागपुरचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

niketan kadam 
 
विशाल आनंद यांची बदली पोलिस अधीक्षक धुळे येथे करण्यात आली आहे. ते गेल्या तीन वर्षापासून अमरावतीत कार्यरत होते. अतिशय संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वात अधिकार्‍यांनी अनेक मोठ्या घटनांचा तपास वेगाने पूर्ण केला. अमरावती ग्रामीणमध्ये ३० पोलिस ठाणे येतात. जिल्ह्याला तीन तालुक्यांना मध्यप्रदेशची सीमा लागली आहे. राजकीय आंदोलनांची तीव्रता इतर जिल्ह्याच्या तुलनेत अमरावतीत जास्त आहे.niketan kadam नुकतेच समोर आलेले परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरण राज्यात चर्चीले जात आहे. अनेक आव्हानांचा हा जिल्हा आहे. नवे पोलिस अधीक्षक लवकरच पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले.