निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीणचे अधीक्षक पदी बदली

- राज्यातील 21 पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
niketan kadam गृहमंत्रालयाने गुरूवारी रात्री राज्यातील 21 पाेलिस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपूरचे पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांचा समावेश आहे. नागपूर पाेलिस आयुक्तालयातील परिमंडळ 5 चे पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीणचे पाेलिस अधीक्षक बदली करण्यात आली. नागपुरात त्यांनी बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले हाेते. यासाेतबच चंद्रपूरचे अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांची अहिल्यानगरचे पाेलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
 
 

निकेतन कदम  
 
 
याशिवाय जालन्याचे अधीक्षक अजय बंसल (सायबर सुरक्षा म. रा.), अमरावती ग्रा. चे अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद (धुळे), नाशिक ग्रा. चे बाळासाहेब पाटील (उपायुक्त मुंबई शहर), अहिल्यानगरचे अधीक्षक साेमनाथ घार्गे (सहायक पाेलिस महानिरीक्षक (नि. व सं.) पाेलिस महासंचालक कार्यालय), परभणीचे अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), राज्य गुप्तवार्ता मुंबईचे संदीप घुगे यांची (उपायुक्त मुंबई शहर), नंदुरबारचे अधीक्षक श्रवण दत्त (अप्पर पाेलिस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पाेलिस महानिरीक्षक आस्थापना), ठाणे ग्रा. चे धाेंडाेपंत स्वामी (नाशिक ग्रा.), वाशिमचे अधीक्षक अनुज तारे (अंमली पदार्थ विराेधी टास्क ाेर्स, पुणे), नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षक अनुराग जैन (उपायुक्त मुंबई शहर), लाेहमार्ग पुणेचे अधीक्षक अश्विनी सानप (नंदुरबार), मालेगावचे अप्पर पाेलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (लाेहमार्ग पुणे), अंमली पदार्थ विराेधी टास्क ाेर्स पुण्याचे निकेश खाटमाेडे (वाशिम), जालन्याचे अप्पर पाेलिस अधीक्षक आयुष निपानी (चंद्रपूर), अमरावती ग्रा. चे पंकज कुमावत (परभणी), परभणीचे अप्पर पाेलिस अधीक्षक सूरज गुंजाल (मालेगाव), ाेर्स वनचे अधीक्षक गजानन राजमाने (उपायुक्त मुंबई शहर) आणि दत्ता ताेटेवाड यांची अप्पर पाेलिस अधीक्षक म्हणून अमरावती येथे बदली करण्यात आली.