वर्धा,
nature experience of bor वन्यजीव विभागामार्फत बुद्ध पौर्णिमेला १ मे रोजी दुपारी ३ ते २ मे च्या सकाळी ८ वाजेपर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रातील पाणवठ्यावर निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता तब्बल १३० नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ व्यक्तीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रात्रभर मचानीवर राहून निरीक्षण करणार्या निवडक व्यक्तींची निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
जैवविविधतेने नटलेला बोर व्याघ्र प्रकल्प विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटकांना भूरळ घालतो. या व्याघ्र प्रकल्पाला सिनेमा दिग्दर्शक ते अनेक सिने अभिनेते व व्हीव्हीआयपींनी हजेरी लावून येथील जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार्या या व्याघ्र प्रकल्पातील रुबाबदार वाघांची एक झलक बघण्यासाठी येथे नेहमीच पर्यटक गर्दी करतात. या व्याघ्र प्रकल्पात १ मे रोजी निसर्ग प्रेमींचा आनंद द्विगुणीत करणारा निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविला जात आहे.nature experience of bor निसर्गनुभवासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात पाणस्थळ परिसरात ४४ मचाणी उभारण्यात आल्या आहे.
निसर्ग अनुभवात सहभाग घेणार्यांची स्थिती
बोरधरण : २४
न्यू बोर : १७
हिंगणी : १२
बांगडापूर : १६
कवडस : ०५