पालकांनो, गाफील राहू नका! : मीरा कडबे

परतवाड्यात विशाल हिंदू जनसभा

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अचलपूर,
meera kadbe आपल्या सोबत अप्रीय घटना होऊ नये यासाठी आपली रक्षा आपल्यालाच करावी लागेल. प्रत्येकाने समाजहिताला प्राधान्य दिले पाहिजे. लव जिहादच्या आड मोठे षडयंत्र रचले जात आहे. आता गाफील राहू नका, असे आवाहन परतवाडा येथील विराट हिंदू जनसभेच्या प्रखर हिंदुत्वादी प्रमुख वक्त्या मीरा कडबे यांनी केले.
 

meera kadbe 
 
परतवाडा येथे विशाल हिंदू जनसभेचे आयोजन बुधवारी सांयकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सर्व प्रथम त्यांच्या हस्ते नऊ कन्यांचे पूजन करण्यात आले. पुढे त्या म्हणाल्या, मुलींना शिकण्याकरता बाहेरगावी पाठवताना त्यांचा धर्म पक्का ठेवा. धर्म पक्का असेल तर त्यांना कोणी जाळ्यात अटकवणार नाही. मी कोण ? हे त्यांना माहीत असणे गरजेचे आहे. मातृशक्तीने मुलीकडे विशेष लक्ष देऊन संस्काराचे धडे देत समृद्ध व सक्षम बनवण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख वक्ते अटल पांडे यांचे ही प्रेरणादायी भाषण झाले. पोलिस व प्रशासन त्यांचे काम करेल. परंतु, अल्पसंख्यांक समाज यांच्यामुळे जागेवर येणार नाही. त्याकरीता हिंदुंनाच सक्षम व्हावे लागेल. लव जिहाद सारख्या घटना परत घडू नये त्यासाठी सर्व हिंदुंनी भाईचारा सोडावा व जशास तसे उत्तर द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.meera kadbe यावेळी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांचेही भाषण झाले. नगराध्यक्ष रूपाली माथने, अ‍ॅड. प्रमोदसिंह गड्रेल यांच्यासह अन्य मान्यवर आणि विविध पदाधिकारी व शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जुळया शहरात ठेवण्यात आला होता.