नागपूर ,
Power Outage महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लिफ्ट बंद पडल्याने सुमारे 10 जण अर्धा तास अडकून पडल्याची घटना घडली. वीजपुरवठा खंडित होऊन बॅकअप जनरेटरही निकामी झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.
अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे सुरक्षा व देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Power Outage यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक अभिजीत झा यांनी लिफ्टचे सुरक्षा ऑडिट व अत्याधुनिक लिफ्ट बसविण्याची मागणी केली आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र