झाड ‘रक्तचंदन’ की ‘बिजासाल’चे पुसद काेर्टात सिध्द करा

- 50 लाख परत मिळविण्यासाठी रेल्वेचा आटापीटा

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
raktachandan or bijasal शेतात रक्तचंदनाचे झाड असल्याचा दावा करुन एका शेतकऱ्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने रेल्वेकडून एक काेटी रुपये मंजूर करवून घेतले. त्यापैकी 50 लाख रुपये बँकेतून काढून खर्च केले. मात्र, आता ते झाड रक्तचंदनाचे नसून बिजासाल जातीचे असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. आता रेल्वेने शेतकऱ्याला 50 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, शेतकऱ्याने रक्तचंदनाचे झाड असल्याचा दावा केला. त्यामुळे ‘ते झाड रक्तचंदनाचे आहे, हे पुसद येथील न्यायालयात सिद्ध करा. त्यानंतर उर्वरित रक्कम हस्तांतरीत करण्यात येईल’ अशी भूमिका रेल्वे विभागाने घेतली आहे. या प्रकरणी गुरूवारी न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
 

रक्तचंदन  
 
 
वर्धा-नांदेड रेल्वे मागासार्ठी माैजा खर्शी येथील शेत करी केशव तुकाराम शिंदे आणि इतर चार शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे रेल्वेने रुळ टाकण्यासाठी भूसंपादन केले गेले. या शेतातील झाडांचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली हाेती. एक झाड रक्तचंदनाचे असल्याने पुसद वनविभागाने या प्रकरणाची अधिक चाैकशी करण्यासाठी बेंगळुरू येथील ’काष्टविज्ञान आणि औद्याेगिकी संस्थान’ या केंद्र सरकारच्या संस्थेकडे चाचणी अहवाल मागितला हाेता.raktachandan or bijasal संस्थेने 23 मे 2025 राेजी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, सदरचे झाड हे रक्तचंदन नसून ते बिजासाल या प्रजातीचे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले हाेते. त्यामुळे झाडाच्या प्रजातीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. खर्शी येथील एका शेतातील झाड दुर्मिळ रक्तचंदन असल्याचा अंदाज हाेता, मात्र शास्त्रीय तपासणीअंती ते ’बिजासाल’ असल्याचे निष्पन्न झाले आहे.