जनगणनेसाठी अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध करून द्या

*जनगणनेसाठी नियुक्त प्रगणकांची मागणी

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
समुद्रपूर,
census जनगणना २०२७ ही पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार असून जनगणनेची माहिती संकलन सेन्सस २०२७- एच. एल. ओ. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर होणार आहे. अपवाद वगळता बहुसंख्य नियुत प्रगणकांकडे फिचर्स असलेला मोबाईल नाही. जनगणनाचे डिजिटल स्वरूपाचे काम व्यवस्थित व्हावे, याकरिता नियुक्त प्रगणकांना अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोन शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे अजय गावंडे यांच्या नेतृत्त्वात चार्ज अधिकार्‍यांना २८ रोजी निवेदन देऊन केली.
 

जनगणनेसाठी नियुक्त प्रगणकांची मागणी 
 
 
जनगणनेच्या कामी नियुक्त प्रगणकांपैकी ९९ टके प्रगणक हे शिक्षक आहेत. ते ज्या गावात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्या गावची बरीचशी माहिती त्यांना अवगत असून गावातील कुटुंब परिचित आहेत.census तसेच उन्हाळी कालावधीत जनगणनेचे काम करावयाचे असल्यामुळे प्रकृतीचा प्रश्न, महिला प्रगणकांना आरोग्यविषयक वैयक्तिक अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी जनगणनेसाठी स्थानिक महसुली क्षेत्र दिल्यास प्रगणकांना सोयीचे होईल, याही मागणीचा निवेदनात समावेश करण्यात आला.