मध्यरात्री ‘क्लोरिन’चा कहर! कोंढव्यात गॅस गळतीने उडाली धांदल

२४ जणांना श्वास घेण्यास त्रास

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
पुणे
chlorine gas leak शहरातील कोंढवा परिसरात गुरुवारी मध्यरात्री क्लोरिन गॅस गळतीची गंभीर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीतून गॅस गळती झाल्यामुळे परिसरातील नागरिकांसह बचाव कार्यात सहभागी झालेल्या जवानांना त्रास जाणवू लागला. या घटनेत फायर ब्रिगेडच्या दोन जवानांसह एकूण २४ जणांना श्वासोश्वास घेण्यास अडचण निर्माण झाली असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

chlorine gas leak 
कोंढवा येथील गंगाधाम परिसरात असलेल्या बंद जलशुद्धीकरण प्रकल्पातील गोदामात क्लोरिनच्या टाकीतून गळती होत असल्याची माहिती मध्यरात्री अग्निशमन दलाला मिळाली. या संदर्भात माहिती देताना अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील नाइकनावारे यांनी सांगितले की, माहिती मिळताच पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या.घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने सर्वप्रथम परिसर रिकामा करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर गॅस गळती रोखण्यासाठी संबंधित टाकीवर पॅच लावण्यात आला. मात्र, या बचाव कार्यादरम्यान दोन जवानांना गॅसचा परिणाम झाला. दरम्यान, गॅसचा परिसरात फैलाव झाल्यामुळे एकूण २२ नागरिकांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.
प्रभावित सर्व २४ जणांना तातडीने chlorine gas leak  ससून जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणाच्याही जीविताला धोका नाही.दरम्यान, बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरिनसारख्या धोकादायक गॅसची टाकी निष्काळजीपणे कशी ठेवण्यात आली, याबाबत प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.