नाफेडव्दारा चणा खरेदीला मुदतवाढ द्या

रामदास तडस यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
ramdas tadas हवामानातील अनियमितता, मजुरांची कमतरता तसेच वाहतूक संबंधित अडचणींमुळे शेतकरी ठरलेल्या वेळेत आपली उत्पादने विक्रीसाठी केंद्रांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. चणा खरेदी २४ एप्रिलपासून बंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपला शेतमाल किमान समर्थन मूल्यावर विक्री करण्यापासून वंचित राहू शकतात. नाफेडद्वारे अचानक खरेदी बंद झाल्यामुळे घरीच पडून आहे.
 

ramdas tadas 
 
त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. माजी खासदार रामदास तडस यांनी केन्द्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना ईमेलने पत्र पाठवुन चणा खरेदीच्या मुदतीत किमान १० ते १५ दिवसांची वाढ करण्याबाबत विनंती केली आहे.
वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकर्‍यांनी हवामानातील अनियमितता, मजुरांची कमतरता आणि वाहतूक समस्यांमुळे अनेक शेतकर्‍यांना आपला चणा वेळेत खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचवता आलेला नाही. दरम्यान, नाफेडमार्फत चणा खरेदी शुक्रवार २४ एप्रिलपासून अचानक बंद करण्यात आल्याने हजारो शेतकर्‍यांचा चणा घरीच पडून आहे. त्यामुळे अनेकांना किमान समर्थन मूल्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.ramdas tadas त्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांसाठी चणा खरेदीची मुदत किमान १० ते १५ दिवसांनी वाढविण्याची विनंती केली आहे. नाफेड खरेदीला मुदतवाढ मिळाल्यास शेतकर्‍यांना उत्पादन योग्य दरात विक्री करता येईल आणि आर्थिक नुकसान टाळता येईल असे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस म्हणाले.