सुलतानपूर
Roaring DJ लग्नसमारंभात अतिशय जोरात वाजणाèया डीजेचा नुसता दणदणाटच संपूर्ण परिसर हादरवणारा असतो. लग्नातील वèहाड्यांसाठी मनोरंजन आणि जल्लोषाचे कारण असणारा डीजे परिसरातील कोंबड्यांच्या जीवावर बेतला आहे. वरातीत डीजेच्या अती तीव्र आवाजामुळे तब्बल १४० कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बल्दीराय परिसरात घडली आहे.
Roaring DJ या विचित्र घटनेनेे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आता या प्रकरणी डीजे मालकावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात घडली. येथील दरियापूर गावातील बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. कुडवार येथून आलेल्या या वरातीत डीजेचा मोठा ताफा होता. ही वरात जेव्हा साबिर अली यांच्या पोल्ट्री फार्मवरून जात होती, तेव्हा डीजेचा आवाज असह्य वाटावा इतका तीव्र होता. साबिर अली यांनी आवाजाची तीव्रता कमी करण्याची विनंती वारंवार केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून डीजे सुरूच ठेवला होता.
Roaring DJ कर्णकर्कश्श आवाजामुळे प्रचंड हादरे बसू लागले आणि कोंबड्या सैरावैरा पळू लागल्या. बघता बघता १४० कोंबड्यांची प्राण सोडला. या प्रकरणी डीजे मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून खरोखरच ध्वनी प्रदूषणामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाला का, याचा वैज्ञानिक तपासही पोलिस खाते करत आहे.