अंजनगाव सुर्जी,
forecast committee शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मंत्रालयामध्ये अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे जे काही प्रस्ताव आले असतील त्या सर्व प्रस्ताव मान्यतेच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न निश्चितपणे केल्या जाईल, असे आश्वासन विधानसभा अंदाज समितीचे सदस्य आमदार किशोर पाटील यांनी २९एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जी नगरपालिकेला दिलेल्या भेटीदरम्यान आयोजित बैठकीत दिले.
याप्रसंगी विधानसभा अंदाज समितीचे सदस्य आमदार कृष्णा खोपडे, आमदार मनीषा चौधरी उपस्थित होते. नगराध्यक्ष अविनाश गायगोले व उपाध्यक्ष प्रियंका मालठाने, मुख्याधिकारी विजय लोहकरे तसेच सर्व सभापती व सदस्य गण तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी नगरपरिषदेबाबत सविस्तर माहिती उपस्थित समितीसमोर दिली. नगराध्यक्षांनी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर माहिती देऊन त्याबाबत येणार्या समस्या व इतर सोयी सुविधांबाबत अंदाज समितीचे लक्ष केंद्रित करून सखोल चर्चा केली. त्यावर उपस्थित समितीने शासन स्तरावर अंजनगाव सुर्जी शहरातील पाणीपुरवठ्याबाबतचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.forecast committee शहराच्या विकासात्मक प्रस्तावाला मंत्रालयीन स्तरावर गती मिळणार असल्याने आता शहरवासीयांच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.