नागपूर,
heatstroke सततच्या वाढत्या तापमानाचा फटका सहण करीत असलेल्या नागरिकांना पारा घसरल्याने किंचित दिलासा मिळाला आहे. बुधवारी तापमान ४४.२ अंश सेल्सिअसवर तर गुरुवारी ४३.६ अंश सेल्सिअसवर पारा होता. काही दिवसांपासून नागपुरात प्रचंड उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच रखरखते ऊन कायम असल्याने कामानिमित्त घराबाहेर जाणे कठीण झाले आहे. दुपारवेळी शहरातील काही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
कडक उन्हामुळे थंडपेयांची मागणी वाढली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान कमी होते. मात्र दुसर्या व तिसर्या आठवड्यात तापमान वाढल्याने नागरिकांचा निघाला. गत २२ दिवसांपासून नागपूरचे तापमान ४२ अंशाच्या वर कायम असल्याने होरपळल्या सारखे झाले आहे. यंदाच्या उन्हाळयात रविवार, २६ एप्रिल रोजी दिवसाचा पारा थेट ४५.४ अंशावर उसळत तापमानाने उच्चांकी पातळी गाठली होती.heatstroke हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हवामान कोरडे राहणार आहे. तथापि, २ मे नंतर काही भागांत ढगाळ वातावरण तुरळक पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली आहे.
यंदा एप्रिलच्या तापमानाने २०१७ चा ४५.५ अंशाचा उच्चांक २००९ सालचा ४७.१ अंशाचा अत्युच्चांक गाठला नसला तरी तीव्रता मात्र त्याप्रमाणेच जाणवत आहे.