दाेन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
students commit suicide शहरात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी दाेन अल्पवयीन मुलांनी गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
 

students commit suicide 
 
पहिली घटना नंदनवन पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन परिसरात घडली. लक्ष नितीन भुरे (वय 17 मूळ रा. गाेंदिया ) हा रायसाेनी पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकायचा. ताे मामाकडे राहायचा. साेमवारी रात्री ताे अभ्यासासाठी खाेलीत गेला. यादरम्यान त्याने खिडकीच्या राॅडला दाेरी बांधून गळाफास घेतला. बराच वेळ झाल्यानंतर लक्ष खाेलीतून बाहेर आला नाही. त्याच्या मामाने माेबाइलवर संपर्क साधला. त्याने प्रतिसाद दिला नाही. मामा खाेलीत गेले असता लक्ष हा गळफास लावलेला दिसला.students commit suicide दुसरी घटना लकडगंज पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी येथील आजमशाह चाैक परिसरात उघडकीस आली. सातव्या वर्गात शिकणाऱ्या हाशिर शाहनू शाह (वय 13) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दाेघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दाेन्ही प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.