पाकिस्तानसाठी 'दुष्काळात तेरावा महिना '

यूएई गुंडाळणार व्यवसाय डबघाईस आलेली अर्थव्यवस्था कोलमडणार

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
दुबई
Pakistan economy एकेकाळी अत्यंत घनिष्ठ मित्र मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या टोकाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तानने दुबईचे प्रसिद्ध अब्जाधीश मलिक रियाझ यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली आणि त्यांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या यूएई सरकारने पाकिस्तानातील व्यवसाय बंद करण्याची आणि गुंतवणूक मागे घेण्याची घोषणा केली.
 
pakistan economy 
Pakistan economy  यूएईच्या निर्णयाने डबघाईस गेलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अल-कादिर ट्रस्ट घोटाळा प्रकरणात अडकलेले दुबईचे उद्योगपती मलिक रियाझ यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान सरकारने थेट इंटरपोलची मदत मागितली. त्यावरून रियाझ यांना नोटीस बजावण्यात आली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. अशातच यूएईचे परराष्ट्र व्यवहार व आंतराराष्ट्रीय सहकार्य मंत्री अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी गुरुवारी समाज माध्यमावरील पोस्टमधून पाकिस्तानातील व्यवसाय बंद करण्याची आणि गुंतवणूक मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर यूएईची दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी एतिसलात यांनीही पाकिस्तानच्या दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan economy  यापूर्वी युएईने आपले ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज वसूल करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला. यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी दुबईच्या उद्योजकाविरोधात अटक वॉरंट काढला, इतकेच नव्हे तर त्यांनी अटकेसाठी इंटरपोलची मदत मागितली. यातून दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले.