उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी पाकिस्तानचा दहशतवादी हल्ल्याचा कट

गुप्तचर यंत्रणांना गोंधळात टाकण्यासाठी वापरताहेत डावपेच

    दिनांक :30-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
UP Assembly Elections पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एका मोठ्या हल्ल्याचा कट रचत आहे. हे साध्य करण्यासाठी धोकादायक डावपेच वापरत आहे, अशी धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या हल्ल्यापूर्वी भारतीय तपास यंत्रणांचे लक्ष विचलित करायचे असल्याने आयएसआय त्यासाठी एक प्रचार मोहीम राबवत आहे.
 

UP Assembly Elections 2026, Pakistan ISI terror plot, 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका हा एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आयएसआय-समर्थित व्यक्ती देशभरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि हेरगिरी करणे यांसारख्या कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत. संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणे हा यामागील उद्देश आहे. या कारवायांमध्ये अचानक झालेली वाढ भारतीय यंत्रणांचे लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने आहे, जेणेकरून एक मोठा हल्ला करता येईल, असे इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाèयाचे मत आहे.
जातीय सलोखा बिघडवण्याचे षडयंत्र
अधिकाèयांना अशीही भीती आहे की, आयएसआय देशातील जातीय सलोखा बिघडवण्याचे षडयंत्र रचत आहे. अनेक संभाषणांवरून असे दिसून येते की, जातीय तणाव भडकवण्यासाठी प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. एका दुसèया अधिकाèयाने सांगितले की, आयएसआय केवळ मोठ्या शहरांनाच नव्हे, तर लहान शहरे आणि गावांनाही लक्ष्य करत आहे, जेणेकरून तपास यंत्रणांची दिशाभूल करून अचानक हल्ले करता येतील.

संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
अलीकडेच, गाझियाबाद पोलिसांनी रेल्वे स्थानके आणि इतर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाèया एका गटाचा भंडाफोड केला. हे सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरे पाकिस्तानस्थित सूत्रधारांना थेट प्रक्षेपण पुरवण्यासाठी बसवले जात होते. त्यामुळे देशभरातील सीसीटीव्ही कॅमेèयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारचे मोठ्या संख्येने कॅमेरे आधीच खरेदी केले गेले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रमुख राजकारण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणुकीपूर्वी रस्त्यावरील खानावळी आणि दुकानांमध्ये बसवले जाऊ शकतात, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

इतर राज्यांतील व्यक्तींचा वापर
आयएसआय गुप्तचर यंत्रणांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध डावपेच वापरत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआय, यावेळी हल्ल्यांंसाठी उत्तर प्रदेशऐवजी इतर राज्यांतील व्यक्तींचा वापर करू शकते, जेणेकरून स्थानिक पोलिसांना हल्ल्यांंची माहितीही मिळणार नाही. विविध राज्यांमधील हेरगिरी आणि दहशतवादी गटांचा पर्दाफाश झाला असला तरी, सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. कारण या दिशाभूल करणाèया डावपेचामागे एक मोठा कट दडलेला असू शकतो, असे या संस्थांना वाटते.
 
 
दहशतवादी हल्ला देशांतर्गत भासवण्याचा कट
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानवर थेट दोषारोप टाळण्यासाठी आयएसआय भारतातील हल्ल्यांंना देशांतर्गत भासवण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याबद्दल पाकिस्तान एफएटीएफच्या निगराणीखाली आहे. यापूर्वी आयएसआयवर अमली पदार्थ आणि दहशतवादी कारवाया चालवल्याचा आरोप आहे. त्यामुळेच आयएसआय प्रत्येक हल्ला देशांतर्गत असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करेल.